संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 28- तालुक्यातील आदर्श नगर रनाळा येथील डॉ अक्षया अमित वाघे यांना मानार्थ औषधी खुले आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मुंबई कडून पीएचडी प्रदान करण्यात आली ,डॉ अक्षया अमित वाघे यांनी “” सध्याच्या परिस्थितीत जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात विजय मिळविण्यासाठी भक्तमर शोलका क्रमांक 16 मनावर होणारा परिणाम अभ्यासणे ” या विषयात डॉ मंजू संदीप जैन ,डॉ अर्चना विनय जैन, डॉ रीचा राजकुमार जैन यांचे मार्गदर्शनात शोध प्रबंध पूर्ण करून पीएचडी प्रदान केली, डॉ अक्षया वाघे यांना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल मित्रमंडळी, नातेवाईक व समस्त जैन समाजाचे वतीने अभिनंदन करण्यात आले.