१०५४ महिलांनी केली मोफत आरोग्य तपासणी, माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान

चंद्रपूर :- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अभियान दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत राबविले जात असुन याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर प्रत्येक झोनमध्ये २७,२८ आणि २९ सप्टेंबर रोजी आयोजीत केले गेले होते. यात १०५४ महिलांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला असुन ५ ऑक्टोबरपर्यंत मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर तपासणी मोफत सुरु राहणार आहे.   

राज्यात माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होत असतांना महिलांमध्ये गरोदरपणात रक्तक्षयाचे कर्करोगाचे प्रमाण वाढत  असून तरूणी व महिलांमध्ये इतर आजार देखील बळावत असल्याचे निदर्शनास आले आहे . या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत १८ वर्षावरील स्त्रियांसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्याचे केंद्र व राज्य शासनाचे निर्देश आहेत.

त्याअनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी नवरात्री कालावधीत २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविल्या जात आहे. सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत हे शिबीर घेतले जात असुन यात तरूणी, महिला व गरोदर महिलांची स्त्रीरोगतज्ञासह रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन, त्वचा व अस्थिरोगतज्ञ, दंतरोग आदी विविध तज्ञ डॉक्टरांतर्फे तपासणी करून उपचार केले जात आहेत.

रक्त, लघवी, सोनोग्राफी, क्ष किरण तपासणी आदी सर्व तपासण्या देखील मोफत केल्या जात आहेत. तसेच आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया सुद्धा केली जाणार आहे. आरोग्य तपासणीसह तरूणी व महिलांना साथरोग, गर्भधारणापुर्वीची काळजी, सकस आहार, कुटूंब कल्याण कार्यक्रम, आभा कार्ड नोंदणी आदींचे मार्गदर्शन देखील वैद्यकिय अधिकार्‍यांतर्फे केले जात असुन अधिकाधिक महिलांनी या मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

समुपदेशनासह पोषण संदर्भात योग्य मार्गदर्शनाची व्यवस्था

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये विविध विषयांवर समुपदेशन केल्या जात आहे. तसेच तज्ञांमार्फत कुटुंब नियोजन, पोषण, स्तनपान, अति जोखमीच्या प्रसुतीकरीता योग्य मार्गदर्शन व समुपदेशन आणि तपासणी या शिबिरामध्ये केल्या जात आहे. सोबतच गरोदर आणि प्रसूत व स्तनदा मातांसाठी रुचकर पण पौष्टिक अशा आहारासंबंधी मार्गदर्शन सुद्धा केले जात आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेवा पंधरवाडा शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद, विविध सेवांचा नागरिकांनी घेतला लाभ 

Sat Oct 1 , 2022
दिव्यांगांना ७,४८,०००/- निधी धनादेशाद्वारे वितरीत १९ बचत गटांना ४० लाखांचे कर्ज मंजुर  चंद्रपूर :-  चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान आयोजित सेवा शिबीरास मोठा प्रतिसाद मिळुन अंदाजे २५०० नागरिकांनी शिबिरात सहभाग दर्शविला.  या सेवा शिबिरांमध्ये नाव दाखल खारीज आदेश, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, रेन वॉटर हार्वेस्टींग प्रमाणपत्र व अनुदान धनादेश वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना,भोगवटादार प्रमाणपत्र, बांधकाम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!