सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ५८ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता.०३) रोजी उपद्रव शोध पथकाने ५८ प्रकरणांची नोंद करून ४७ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून ४ हजार ४०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ४ ०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार २०० रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून २५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गराज व इतर दुरुस्तीचे व्यावसायिकांचे रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ०२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास १८ प्रकरणांची नोंद करून ३ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०६ प्रकरणांची नोंद करून ०६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अशा एकूण ५८ प्रकरणांची नोंद करून ४७ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या ०३ प्रकरणांची नोंद

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवार (ता: ०३) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०३ प्रकरणांची नोंद करून १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत धरमपेठ झोन येथील मे. रॉयल बिल्ड्कोन प्रेरणा नगर, फ्रेंड्स कॉलोनी काटोल रोड यांच्यावर कारवाई करीत १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच रुग्णालयातील कचरा अनधिकृत ठिकाणी जाळणे या प्रकरणी विम्स हॉस्पिटल कामठी रोड यांच्यावर कारवाई करीत ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण ०७ प्रकरणाची नोंद करून ५० हजार दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांबाबतच्या विखाराला आवर घाला अन्यथा जनताच पराभवाची धूळ चाखवेल - भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा काँग्रेसनेत्यांना इशारा

Thu Apr 4 , 2024
मुंबई :- काँग्रेस पक्ष हा राक्षसी शक्तींचे आगर बनला असून काँग्रेस नेत्यांकडून महिलांना वारंवार गलिच्छ भाषेत अपमानित केले जात आहे. महिलांबाबतच्या या विखाराला काँग्रेसने वेळीच आवर घालावा अन्यथा जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवत पराभवाची धूळ चाटवेल अशी टीका भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. प्रसिद्धीपत्रकात श्रीमती वाघ यांनी लिहीले की, भारतीय संस्कृतीमध्ये यत्र नार्यस्तु पूज्यन्ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com