सोनुली गावातील 6 म्हशी 20 कोबड्यासह शेतीचे साहित्य गेली वाहुन ; उशीरा पोहचले प्रशासन..!

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

गोंदिया – तिरोडा तालुक्यातील सोनुली व सालेबडी या गावाला मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासन मात्र वेळेवर पोहचले नसल्याने गावकरी आक्रमक झाले होते.

सोनुली गावातील पुनीत ठाकरे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून 6 म्हशी 20 कोंबड्या , रासायनिक खतांच्या 20 बोरी शेतीचे साहित्य वाहून गेले आहे. तर गावातील अन्य नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.तर सालेबडी गावातील शाळेत गुडघ्याभर पाणी साचल्यामुळे दस्तावेज भिजू शकतात. गावात गटविकास अधिकारी सतिश पारधी यांनी भेट दिली असुन किरण पारधी जिल्हा परिषद सदस्य यांनी गावात जाऊन पाहणी केली . प्रशासनाचे डोंगली गावात उशीरा पोहचले ,वेळेवर पोहचले असते तर शेतकऱ्यांचे म्हशी सह इतर. साहित्य वाचले असते असे सोनुली गावातील नागरिकांनी सांगितले. बेलाटी खुर्द कवलेवाडा पुजारीटोला सोनुली सालेबडी भबोडी मार्ग बंद झाला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पुराच्या पाण्यात अडकलेल्या पती पत्नीला वाचवण्यात यश..

Wed Aug 10 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पांजरा येथील नाल्यावरील विटा भटिवर काम करणारे मजुर पती पत्नी सुरेश उके, उमिला उके, अचानक पाणी वाढल्याने अडकुन पडल्याने त्यांना रस्सीच्या व लाकुडच्या सहाय्याने रामेश्वर चौधरी, प्रदिप मडावी पांंजरा यांनी सहाय्याने बाहेर काढण्यात आले असून ते जोडपे डाकराम सुकडी येथील रहिवासी आहेत.यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणावर झाला आहे. Follow […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com