गरोदर मातांना टप्प्याटप्प्याने मिळणार 5 हजार रुपयांचा लाभ:-डॉ शबनम खानुनी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान

कामठी ता प्र ३ :- प्रधानमंत्री मातृ वंदन योजना अंतर्गत शासनाकडून प्रथम गरोदर मातेला प्रथम टप्पा रुपये 1 हजार , दुसरा टप्पा रुपये 2 हजार व तिसरा टप्पा रुपये 2 हजार रुपये असे एकूण 5 हजार रुपये लाभ दिल्या जातो .या योजनेची व्यापक जनजागृती होण्याच्या दृष्टीने व शासनाच्या या योजनेपासून लाभार्थी वंचित राहणार नाही याकरिता प्रधानमंत्री मातृ वंदन योजना सप्ताह दिनांक 1 सप्टेंबर 2022 ते 7सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये तालुक्यात राबविण्यात येत असून लाभार्थ्यांचे बँक खाते सुदधा उघडून देण्याची सोय करण्यात आली आहे तेव्हा शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ शबनम खानुनी यांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेच्या सप्ताह कार्यक्रमात व्यक्त केले.तसेच ज्या मातांची प्रसूती होऊन सुद्धा प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या मातांना प्रसूती नंतर 460 दिवसापर्यंत लाभ देता येतो अशी माहिती सुद्धा सांगितले.

याप्रसंगी आशा वर्कर राजेश्री माटे, विमल झंझाड आदी आशा वर्कर सह लाभार्थीगण उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सर्पमित्राने दिला सहा फूट लांबीच्या अजगरला जीवनदान

Sat Sep 3 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 3 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलाब नगर परिसरात एक सहा फूट लांबीचा अजगर दिसल्याने कुणाची जीवितहानी न व्हावी यासाठी पसरलेल्या भीतीमय वातावरणात सर्पमित्र अनिल बोरकर ला संपर्क साधला असता सदर सर्पमित्राने त्वरित घटनास्थळ गाठून या सहा फूट लांबीच्या सापाला शिताफीने ताब्यात घेत नागपूर च्या वनपरिक्षेत्र कार्यालयात सुरक्षित पोहोचविण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com