मुंबई :-भारतीय जनता पार्टी, प्रदेश माध्यम विभागातर्फे शुक्रवार १७ मार्च रोजी पक्षाच्या प्रवक्त्यांसाठी अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात होणाऱ्या या वर्गाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून अभ्यासवर्गाचा समारोप संध्याकाळी साडे सहा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने होणार आहे. या अभ्यासवर्गात प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदींचे मार्गदर्शन होणार आहे.