नागपूर :-मूल्याधिष्ठित शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर ही राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. याचीच फलश्रृती आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारे 2022-23 वर्षात घेण्यात आलेल्या कर सहायक निरीक्षक (एसटीआय), पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) पदाच्या ओबीसी प्रवर्गातील निकालात महाज्योतीच्या 52 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.
एमपीएससीच्या कर सहायक पदासाठी एकूण 475 जांगा पैकी 212 जागा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी होत्या. महाज्योती अंतर्गत ज्ञानदीप अकादमीचे 43 तर युनिक अकादमीच्या 9 विद्यार्थी उत्तीर्ण होत त्यांनी यश प्राप्त केले आहे. विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच 52 ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राजेश खवले यांनी दिली.
शिक्षणाचे महत्व अबाधित आहे. शिक्षणामुळेच आपले स्वप्नांची दारांची चावी मिळविता येते. यानंतरच भविष्यात यशस्वी करियर घडविण्याचा मार्ग मोकाळा होत असतो. यानंतर विद्यार्थ्यांना शासन सेवेत योग्य ती संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हे ‘महाज्योती करीत आहे. त्यामुळेच आज एमपीएससीच्या कर सहायक, सहायक कक्ष अधिकारी व पोलिस उपनिरीक्षक निकालातून 52 पेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी एकंदरीत मिळविलेले यश हे मिळालेल्या दर्जेदार प्रशिक्षणातूनच दिसून येत असल्याचा विश्वास श्री. राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.