20 गजराजची झुंड गोंदिया जिल्ह्यात !खोळदा-बोळदा परिसरात दर्शन…गावकऱ्यांना दिला अलर्ट..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गडचिरोली –  जिल्ह्याच्या जंगलात वास्तव्यास असलेले गजराज गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले असून आज शंकरपूर, बोळदे मार्गे ते गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या खोळदा गावानजीकच्या जंगलात अनेकांनी बघितले आहेत।काही प्रमाणात शेतातील धानपिकाचे नुकसान केल्याचेही सांगितले जात आहे.तब्बल सुमारे 20 गजरांची हा झुंड आहे.आसाम राज्यातील माहूत महाराष्ट्रातील लोकांना पूर्वी गजराजचे दर्शन घडवीत असत.मात्र आता प्रत्यक्षात गजराजाचे दर्शन गोंदिया जिल्ह्याच्या मोरगांव अर्जुनी तालुक्याच्या गड़चिरोली सिमा परिसरातील लोकांना एक घडले आहे.

 

तब्बल 20 हत्तीचा हा झुंड गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याकडे आगेकूच केल्याची सूचना वनविभागाला मिळाली आहे.गोंदिया जिल्ह्याच्या खोळदा ते बोळदा दरम्यानच्या जंगलात लोकांनी गजराज बघितले गेले आहेत.आता हे गजराज नदी ओलांडून बोरी या गावाकडे कूच करतात की वडेगाव बंध्या मार्गे केशोरीकडे वळतात यावर वनविभाग लक्ष ठेऊन आहे.मात्र अचानक गोंदिया- गड़चिरोली सिमेवर गजराजाचे दर्शन घडल्याने गोंदिया कर सुखावले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com