मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी गजाआड..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणची कार्यवाही. 

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग कांद्री येथे फिरत्या गाडीवर खाद्य पदार्थ विक्री करताना दुकानदारास मारहाण करून लुटमार करणा-या टोळी तील मुख्य आरोपी चोरवा उर्फ ईरफान शेख यास स्था निक गुन्हे शाखेच्या पथकाने सिताफितीने पकडुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले.

नागपुर ग्रामिण हद्दीत कांद्री कन्हान येथे (दि.३) डिसेंबर ला विरेंद्र रामअवतार यादव वय ५० वर्ष राह. संताजी नगर वार्ड न ०५ सैनिक कॅन्टीन जवळ कांद्री कन्हान यांनी पोलीस स्टेशन कन्हान येथे तोंडी रिपोर्ट दिली की, फिर्यादी याचा पानगे व चिकन विक्रीचा फिरत्या गाडीवरील ठेला असुन यातील आरोपी १) चोरवा उर्फ ईरफान शेख, २) अमन खान, ३) अमन कैथवार, ४) नितिन खोब्रागडे, ५) डिस्को विशाल व त्याचे तिन अनोळखी साथीदार सर्व राह.कांद्री-कन्हान ता. पारशिवनी या आरोपीतांनी फिर्यादीकडे खंडणी मांगितली ती देण्यास नकार दिल्याने आरोपीतांनी फिर्यादीला हाथबुक्कीने मारहाण केली. व सोडण्यास आलेला फिर्यादीचा पुतण्या हिमांशु यादव यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याला चाकुने वार करून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे खिशातील रोख ३००० रूपये लुटुन नेले. अशा फिर्यादीचे तोंडी तक्रारी ने पोलीस स्टेशन कन्हान अप क्र. ६९९ / २२ कलम ३८७, ३९७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला होता. सदर गुन्हयाचे समांतर तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखे चे पथकाने गुन्हयातील आरोपी शोध संबंधाने पोलीस स्टेशन कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हयातील मुख्य आरोपी इरफान उर्फ चोरवा शेख यास सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले. विचारपुस दरम्यान त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितल्याने आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलीस स्टेशन कन्हान यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कार्यवाही  पोलीस अधिक्षक  विशाल आनंद नागपुर ग्रामिण, अपर पोलीस अधि क्षक डॉ. संदिप पखाले, ना. ग्रा. यांचे मार्गदर्शनात स्था निक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मल वार, जितेंद्र वैरागडे, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, रोशन काळे, गजेंद्र चौधरी, पोलीस नाईक , रोहन डाखोरे, विरेंद्र नरड, चालक पो हवा ज्ञानेश्वर पाटील, अमोल कुथे यांनी यशस्विरित्या पार पाडली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com