राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन साजरा

मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस शनिवारी (दि. १ फेब्रू) मुंबई येथे साजरा करण्यात आला.

या प्रसंगी तटरक्षक दलाच्या विस्तार योजनेचे कौतुक करताना १५१ हून अधिक जहाजे, ७८ विमानं आणि ४६ प्रगत रडार स्थानकांसह, भारतीय तटरक्षक दल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तटरक्षक दल झाले असल्याचे सांगितले.

राज्यपालांनी भारतीय तटरक्षक दलाचे देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (EEZ) विस्तीर्ण भागावर चोवीस तास निगराणी ठेवण्यासाठी कौतुक केले.

गुजरात आणि केरळमधील विनाशकारी पुरस्थितीनंतर मदत व बचावकार्याच्या वेळी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज्यपालांनी तटरक्षक दलाचे अभिनंदन केले.

राज्यपालांनी किनारपट्टी स्वच्छता मोहिमा आणि वृक्षारोपण यांसारख्या पर्यावरणीय उपक्रमांसाठी तटरक्षक दलाचे विशेष कौतुक केले.

यावेळी नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जे सिंह, भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे महासंचालक ए. के. हरबोला, तटरक्षक दलाच्या पश्चिम तट विभागाचे कमांडर महानिरीक्षक भिषम शर्मा तसेच भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना राज्यपालांनी तटरक्षक दलातील वरिष्ठ अध‍िकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व तटरक्षक दलाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पंडित राहुल शर्मा यांनी संतूर वंदन सादर केले. पंडित आदित्य कल्याणपूर यांनी त्यांना तबला साथ केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या श्रमाला न्याय देणारा अर्थसंकल्प - ॲड. धर्मपाल मेश्राम

Sun Feb 2 , 2025
नागपूर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकऱ्यांच्या श्रमाला न्याय देणारा आहे, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गाच्या उत्थानासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केल्याबद्दल ॲड. मेश्राम यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड्सच्या या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!