अमरदिप बडगे, प्रतिनिधी
– पोलिस निरीक्षक रेवंचद सिंगनजुडे यांची मोठी कारवाई
गोंदिया – जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील शिमा शुल्क तपासनी नाका शिरपुर/बांध येथे देवरी पोलिसानीं आज दुपारी ४ वाजता सुमारास रायपुर कडुन नागपुर कडे जात अलेल्या सहा चाकी वाहनाची झळती घेतले असता त्या वाहनात ४७ किलो गांजा आढळुन आल्याने तालुक्यातील ही मोठी कारवाई देवरी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक केल्याची चर्चा चांगलीच सुरू असुन अवैध धंधे करणाऱ्यांचे या कारवाईमुळे चांगलेच मुस्के आवरनार असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर असे की, देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यानां सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारावर देवरी पोलिस स्टेसनचे पोलिस निरीक्षक व सहकारी पोलिस कर्मचारी शिरपुर बांध येथिल सीमाशुल्क तपासनी नाक्याकडे रवाना झाले. पोलिसांनी वाहन तपासनीला सुरूवात करताच सहाचाकी वाहन क्रमांक MH 04 KU 4068 या वाहनात 47 किलो गांजा आढळुन आला. आज स्थीतीत या गांजाची किमंत बाजारात अंदाचे 4 लक्ष 70 हजार रुपये असल्याचे सांगन्यात येत आहे. सदर आरोपीला देवरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.देवरी पोलिसांनी जप्त केलेला 47 किलो गांजा किमंत 4 लक्ष 70 हजार रुपये, वाहन किमंत 15 लक्ष रुपये असा एकूण 19लक्ष 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक रेवचंद सिगंनजुडे करीत आहेत.