उद्योजिका महोत्सवात सतनाम कौरला द्वितीय पुरस्कार

– भौतिकशास्त्र विभागातील विद्यार्थिनीला सन्मान

नागपूर :- उद्योजिका स्वावलंबन महोत्सवात भौतिकशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी सतनामकौर मट्टू हिने द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, महिला उद्योजकता शाखा व बॅरिस्टर शेषराव वानखेडे संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती कुसुमताई वानखेडे यांच्या स्मृतिपित्यर्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सतनाम कौर हिला विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन महिला उद्योजकता शाखेच्या अध्यक्ष रश्मी कुळकर्णी, सचिव योगिता देशमुख, संतोष मोरे, प्रकल्प संचालक अमरदीप कौर व तेजल रक्षमवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘नवकल्पनांच्या उद्दिष्टांसह शाश्वत विकास’ या विषयावर ही स्टार्टअप स्पर्धा घेण्यात आली होती. सतनामने तणाव कमी करण्याच्या अनुषंगाने खेळण्याप्रमाणे असलेले मॉडल पीपीटीद्वारे सादर केले. सतनाम कौर मट्टू ही भौतिक शास्त्र विभागातील पीएचडी संशोधक विद्यार्थिनी आहे. सतनाम ही विभागातील डॉ. अभय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण करीत आहे. पुरस्कार प्राप्त केलेल्या विषयांमध्येच ती स्टार्टअप करीत आहे. या स्पर्धेमध्ये सतनाम हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओमप्रकाश चिमणकर, डॉ. अभय देशमुख यांनी तिचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पशुसखीच्या प्रशिक्षणामुळे महिलांमध्ये नवोन्मेशाचा उत्साह संचारेल - प्रा. डॉ. अनिल भिकाने

Fri Oct 20 , 2023
नागपूर :- आजच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत असून ग्रामीण भागातील महिला शेती करून आपले आणि पर्यायाने कुटुंबाचा एक मुख्य आधार म्हणून उदयास येत आहेत. त्या करीता पशुसखीच्या क्षमता बांधणीचा उत्कृष्ट असा उपक्रम माविम च्या सोबतीने राबवित असून यात प्रत्येक गावात एक प्रशिक्षित पशुसखी तयार होईल आणि पशुसंवर्धन आणि विशेषतः शेळी पालनातून ग्रामीण विकास साध्य केला जाईल, असे प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!