आजोबा व अन्य दोन व्यक्तिने केला अल्पवयिन नातनी वर अत्याचार…लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना..

नितीन लिल्हारे

मोहाडी :- भंड़ाऱ्यांत सख्खा आजोबाच आपल्या नातनीचा वैरी निघाला असून नात्याला काळीमा फासत आजोबाने असहायतेचा फायदा उचलत आपल्या अल्पवयिन नातनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस स्टेशन हद्दित घडली आहे. दरम्यान त्या अल्पवयिन नातनी वर अन्य दोन आरोपींनी ही अत्याचार केल्याचे सामोर आले असून आता आरोपी आजोबा सह अन्य दोन आरोपीवर लाखनी पोलिसांनी अत्याचार सह पोस्को कायद्या नुसार गुन्हा नोंद करंत अटक केली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. विलास देवराम तुमसरे वय 56 वर्ष, यशवंत तातोबा कमाने वय 67 वर्ष दोन्ही रा. गडेगाव ता. लाखनी, अनिल रमेश सेलोकर वय 25 वर्ष रा. रोहणा ता. मोहाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत.

पीडिता ही 13 वर्षांची असून पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला असून ती आई आणि आजोबासह राहते. तिच्यावर 2019 पासून हा अत्याचार होत होता. 11 वर्षाची असतांना तिला पहिला अत्याचारांचा सामना करावा लागला. 2019 मध्ये पीडिता ही एकटीच शेतात गेली असतांना तिथे कोणीच नसल्याची संधी साधून आरोपी विलास तुमसरे याने तिला बळजबरीने शेतातील झोपडीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर, घटनेबाबत वाच्यता केल्यास भावाला आणि आईला मारून टाकेल अशी धमकी दिली. पीडितेने घटनेची माहिती कुणालाही दिली नाही. त्यामुळे आरोपीची हिम्मत वाढल्याने त्याने चिमुकलीवर आणखी तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान सख्ख्या आजोबानेही नातनी वर वाईट दृष्टी ठेवून तिच्याशी वेळोवेळी अश्लील चाळे केले. असाच प्रकार नात्यात काका लागणाऱ्या अनिलने ही केला आहे. मागील तीन वर्षांपासून वारंवार होणारा अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने स्वतः पोलिसात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पीडितेच्या तक्रारीवरुन आजोबांसह तिघांविरुद्ध विनयभंग, अत्याचार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली व तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com