संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 6 जानेवारीला होणार उपसरपंच पदाची निवड
– सरपंचाच्या अधिकच्या मताला आले.. महत्व,उपसरपंचपदासाठी अर्थपूर्ण हालचाली..
कामठी ता प्र 28 :- 18 डिसेंबर ला पार पडलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत 27 सरपंच व 93 प्रभागातील 247 सदस्त निवडून आले असून थेट जनतेतून 27सरपंच निवडून आले असले तरी निवडुन आलेल्या सदस्यमधून उपसरपंच पदाची निवड होणार आहे .तर येत्या 6 जानेवारी 2023 ला उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे तेव्हा या विजयी झालेल्या सदस्यमध्ये कोणाची उपसरपंच पदी पदोन्नती होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
उपसरपंच पदासाठी 6 जानेवारी 2023 या कालावधीत निवडणूक होणार असून त्याबाबतचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.तर निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांसाठी आयोजित प्रथम सभेत उपसरपंच पदाची निवड होणार आहे सरपंचानाही मतदानाचा अधिकार देण्यात आला असून निर्णायक मत देण्याचा विशेषाधिकार दिला आहे त्यामुळे निवडणुकीची चुरस चांगलीच वाढनार आहे.
ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक ही पीठासीन अधिकारी नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंचांना मतदानाचा अधिकार राहणार असून संमसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देता येणार आहे. तसेच एखाद्या ग्रा प उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच अनुपस्थित राहिल्यास नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक ही निवडणूक प्रक्रिया पार पाडतील.
यावर्षी सरपंच पद हे थेट जनतेतून निवड असल्याने सदस्यापेक्षा सरपंच पदाच्या निवडणुका फार अटी तटीमध्ये पार पडल्या असून निवडणुकीमध्ये मतदारांनी बहुतांश ठिकाणी जुन्या सदस्यांना डावलून नविन सदस्यांना संधी दिल्यामुळे गावात धक्कादायक निकाल हाती लागले आहेत.निवडणुका पार पडताच विविध पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपापल्या पक्षाचा दावा करीत ग्रामपंचायत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे .
-उपसरपंच पदाची निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
– येरखेडा,रणाळा, खैरी, बिना,भिलगाव, खसाळा, सुरादेवी,खापा, कढोली,भोवरी,आजनी,लिहिगाव,कापसी बु, गादा,सोनेगाव,गुमथी, आवंढी,गुमथळा, तरोडी बु,परसाड, जाखेगाव, केम, दिघोरी, आडका, शिवणी, भुगाव,वडोदा ग्रामपंचायत चा समावेश आहे.