प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल

पुणे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चाैथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आलीये. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल लागणार आहे.

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं… उष्णतेमुळे या जिल्ह्यात जमावबंदी; कोचिंग क्लासेसवर निर्बंध

Sat May 25 , 2024
जळगाव :- महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील तापमान प्रचंड वाढले आहे. 40 अंश सेल्सियसच्या वर गेलेल्या तापमानात अंगाची लाहीलाही होत आहे. परंतु राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही शहरांमधील तापमान 45°c वर गेले आहे. यामुळे उष्मघाताचा धोका निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 45°c वर गेला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com