वीज ग्राहकांना 27.78 कोटींचा परतावा

नागपूर :- वीज ग्राहकांच्या महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर नागपूर परिमंडलातील लघुदाब वीज ग्राहकांना आर्थिक वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 27 कोटी 78 लाख 44 हजार 806 रुपये व्याज देण्यात येत असून त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील तब्बल 16 लाख 7 हजार 348 ग्राहकांना 23 कोटी 84 लाख 38 हजार 320 रुपये तर वर्धा जिल्ह्यातील 4 लाख 33 हजार 609 वीज ग्राहकांना 3 कोटी 94 लाख 6 हजार 486 रुपयांचे व्याज देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. व्याजाची ही रक्कम ग्राहकांच्या वीज बिलात समयोजित करण्यात येत आहे.

सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतल्या जाते? त्यावर व्याज मिळते का? असे एक नाही तर असंख्य प्रश्न सामान्य वीज ग्राहकाला नेहमीच पडत असतात. मुळात वीज ग्राहकांकडून घेण्यात येत असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्याच कल्याणासाठी महावितरणतर्फ़े वापरल्या जाते, एवढेच नव्हे तर त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार व्याजही दिल्या जाते. महावितरण ही ग्राहकांच्याच भरवश्यावर चालते, ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलाच्या रकमेतूनच वीज खरेदी, वीजवहन आणि वितरण, देखभाल आणि दुरुस्ती तसेच प्रशासनावरील खर्च भागविला जातो. अश्या वेळी ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरले तरच वीज खरेदी व वितरण करणे महावितरणला सहज शक्य होते.

वीज वितरण कंपनी वर्षातून एकदा वीज वापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निधारण करू शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील दोन महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिल्या जाते. वीज ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फ़रकाच्या रकमेचे बील म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील दिल्या जाते. ज्या ग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा महावितरणकडे भरणा केला नसेल त्यांची ती थकबाकी सुरक्षा ठेवीतील व्याजमधून वळती करण्यात येत आहे.

वीज ग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर कालावधिनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्याचेही नियामक आयोगाचे निर्देश आहेत. महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करतेवेळी ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केल्या जाते. त्यामुळे ग्राहकांनी अतिरीक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

आर्थिक वर्ष 2023 – 24 मध्ये जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर महावितरणने निश्चित केलेले व्याज

विभाग लघुदाब ग्राहकांची संख्या निश्चित केलेले व्याज

काँग्रेस नगर 273827 61245725.21

सिव्हील लाईन्स 215492 27342027.73

महाल 294009 43173702.08

गांधीबाग 161053 21310193.32

बुटीबोरी विभाग 130594 27575345.49

मौदा विभाग 170370 21507844.02

उमरेड विभाग 108467 10185621.04

सावनेर विभाग 137842 16146200.64

काटोल विभाग 115694 9951660.65

एकूण नागपूर जिल्हा 1607348 23,84,38,320.2

आर्वी विभाग 130538 10440012.48

हिंगणघाट विभाग 110899 9699439.41

वर्धा विभाग 192172 19267034.44

एकूण वर्धा जिल्हा 433609 39406486.33

एकूण नागपूर परिमंडल 2040957 277844806.5

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्तीसगढ़ हॉकी टीम की घोषणा

Sat Jul 20 , 2024
राजनांदगांव :- बालिका वर्ग में ज्योति रानी, अंचल पटेल, नेहा कुमारी,एंजल वाय दास, वसुंधरा मंडावी, सोनम राजभर, मीनाक्षी उमरे, भूमिका धनकर,खुशबू साहू,गीता यादव, रूखमणी,शैली सोनी,आँचल वर्मा,केशरानी साहू,मनीषा साहू, काजल यादव,अक्सा प्रवीण, परमेस्वरी कोच अंचला शर्मा व मैनेजर आशा थॉमस रहेंगे। वही बालक वर्ग में देवेंद्र यादव, महावीर वर्मा,प्रकाश पटेल,गौरव यादव,पीयूष धीवर, मोहित पांडेय,मोहित नायक,आनंद सूर्यवंशी,ओम रुद्र नामदेव, सुमित मिंज,निशांत तिरकी,रितिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com