नागपूर :- जी.एस.रायसोनी विद्या निकेतन हिंगण्यात नुकत्याच झालेल्या स्मार्ट TV प्रशिक्षणात बुधवारी, हिंगणा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणा तालुक्यातील गटविकास अधिकारी संदीप गोटशेलवार तसेच हिंगणा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी जोत्सना हरडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली या दरम्यान वर्ग 1 ते 5 या वर्गातील शिक्षकांसाठी संपर्क फाउंडेशन च्यावतीने सर्वाच्या उपस्थित 150 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, हिंगणा, कळमेश्वर, उमरेड आणि रामटेक याठीकाणी संपर्क फाऊन्डेशनने संपूर्ण शाळेला 400 स्मार्ट टीव्ही दिल आणि आज त्या स्मार्ट टीव्ही ला जोडणारा डिवाइस गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शिक्षकांना देण्यात आला.
हिंगणा तालुक्यात 100 स्मार्ट TV आणि सोबतच डिवाईस वाटप केले. संपर्क फाउंडेशनच्या वतीने शाळेला मोठा स्क्रीन व डिवाइस सुद्धा उपलब्ध करून दिले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकते अशी प्रक्रिया व संबधीत घटकही यांमध्ये तयार करून दिली आहे. गरजू, होतकरू, गरीब विद्यार्थ्यांपर्यंत डीवाईस च्या माध्यमातून पोहोचू शकते. याला इंटरनेटची आवश्यकता किंवा गरज नाही. हे दुर्गम भागातमध्ये ही काम करू शकते. विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त आहे. मुलांना या मोठ्या स्क्रीनवर दाखवल्यानंतर त्याचा खूपच फायदा होऊ शकतो व मुलांची बुद्धिमत्ता वाढते. यावेळी शिक्षक प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग देणारे प्रमुख प्रियंका मेंढे, महेश होले आणि स्वप्निल चिकटे यांनी शिक्षकांना खुप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले.
हिंगणा तालुक्यातील केंद्रप्रमुख भूपेश चव्हाण, राजकुमार पचारे, विजय धनकोतवाल, विजय कृपाल, लीलाधर चरपे, माया शेंडे, एकनाथ ढोरे, ज्ञानेश्वर आपतूरकर, संध्या येळणे, संघपाल शंभरकर या सर्वांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शुभांगीनी वालदे, राजकुमार चोबे, सुरेखा घाटोळे, पुष्पा रेवतकर, अमर गायकवाड, हर्षा मोडक आणि अश्विनी मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे संचालन भूपेश चव्हाण केंद्रप्रमुख गुमगाव यांनी केले तर आभार केंद्र प्रमुख विजय धनकोतवाल यांनी मानले.