कामठीतुन 21 वर्षीय मतिमंद मुलगा बेपत्ता 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- गोंदिया हुन नागपूर कडे रेल्वेगाडीने प्रवास करीत असलेला 21 वर्षीय मतिमंद मुलगा कामठी रेल्वे स्टेशन समोरील तीन की मी अंतरावर रेल्वे गाडी खाली उतरला मात्र गाडीत चढलाच नाही यावरून सदर मतिमंद मुलगा बेपत्ता झाल्याची घटना काल रात्री 11 वाजता घडली असून बेपत्ता झालेल्या मतिमंद मुलाचे नाव खुशाल राष्ट्रपाल करवाडे वय 21 वर्षे रा. रामनगर जि.गोंदिया असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर बेपत्ता मतिमंद मुलगा हा काल 8 डिसेंबर ला रात्री 11 वाजता गोंदिया वरून वडील नामे राष्ट्रपाल करवाडे यांचे सोबत इंटरसिटी रेल्वे नी नागपूर इतवारी येथे येत असता कामठी नंतर 3 की मी पुढे रेल्वेगाडी थांबली असता सदर मुलगा रेल्वेगाडीच्या खाली उतरला आणि लगेच रेल्वे सुरू झाली त्यामुळे तो रेल्वेत बसू शकला नाही. दरम्यान त्याचा बराच वेळ शोध घेऊनही कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.यावरून नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आला.

सदर बेपत्ता मुलाची उंची ५.५ इंच असून रंग सावळा आहे तर अंगात पिवळ्या रंगाचा स्वेटर, आत मध्ये पांढरी टी-शर्ट व निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट घातलेला;आहे ,केस छोटे काळे ,पायात पांढऱ्या रंगाची प्लास्टिक चप्पल घातलेला आहे तेव्हा सदर वर्णनाचा बेपत्ता मुलगा आढळल्यास कामठी पोलीस स्टेशन ला माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करण्यासाठी अधिवक्ता परिषदेचे योगदान महत्वाचे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sun Dec 10 , 2023
बुलडाणा :- सामान्य माणसाचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे, तोपर्यंत लोकशाहीला धोका नाही. जनसामान्यांच्या मनातील न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ करण्यासाठी व न्यायव्यवस्थेचे पावित्र्य जपण्यासाठी अधिवक्ता परिषदेने योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह, विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेगाव येथे केले. Your browser does not support HTML5 video. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com