रक्तदान एक चळवळ समजून राबविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा ठाणेदार- दीपक भीताडे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- रक्तदान एक चळवळ समजून राबविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जुने कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे यांनी श्री साईबाबा मंदिराचे वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन ठाणेदार दीपक भिताडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व श्री साईबाबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी मंदिराचे संस्थापक श्रीकृष्ण देवनाथ बाबा, मंदिराचे ट्रस्टी नरेश बर्वे, उमाशंकर सिंग, मनोहर मनसुरकर,गणेश यादव, दिलीप बडवाईक, रवी कोतपल्लीवार ,सुदेश अग्रवाल, लाला खंडेलवाल, राजू भूटानी उपस्थित होते रक्तदान शिबिरात ठाणेदार दीपक भिताडे यांचे सह ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले, मेडिकल हॉस्पिटल नागपूरचे डॉ गौरव बागडे, डॉ किशोर धर्माळे ,डॉ यशवंत हाडेकर ,विक्रम लांजेवार ,आशिष पवार ,अमोल पाटील ,अमोल फाटे, अमर पलेरिया, रॉबिन जॉन, नितीन बेलसरे, संतोष टेंभेकर, उमेश उकुडे, खुशाल कोल्हे, विजय कोल्हे ,अशोक खैरकर ,विजय उरकुडे , मनोज शिंगणे यांनी रक्त संकलन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजधानीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा

Mon Oct 30 , 2023
नवी दिल्ली :- महाराष्ट्र सदन येथे आज ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. या यानिमित्त भ्रष्टाचारविरूद्ध लढा देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात येतो. यावर्षी 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा : राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’ ही संकल्पना घेऊन हा सप्ताह साजरा केला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com