पंचायत समिती रामटेक येथे ‘ शिवस्वराज्य दिन ‘ उत्साहात साजरा

– सभापती, उपसभापती, बी.डी.ओं. ची हजेरी

– सभापती, उपसभापतींनी उभारली ‘ गुढी ‘

रामटेक :- शासनाच्या आदेशानुसार ६ जुन ‘ शिवस्वराज्य दिन ‘ म्हणुन पंचायत समीती तथा इतर काही कार्यालयांमध्ये साजरा करावयाचा होता. त्या अनुषंगाने काल दि. ६ जुन ला पंचायत समीती रामटेक येथे ‘ शिवस्वराज्य दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पं.स. सभापती संजय नेवारे, उपसभापती नरेंद्र बंधाटे, बिडीओ जयसिंग जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर पंचायत समीती सभापती संजय नेवारे व उपसभापती नरेंद्र बंधाटे यांचे हस्ते पंचायत समीती भवनावर गुढी उभारण्यात आली व जयघोष करण्यात आला. यावेळी उपस्थितांमध्ये सभापती संजय नेवारे, उपसभापती नरेंद्र बंधाटे, बी.डी.ओ. जयसिंग जाधव, विनोद चरपे सहाय्यक बीडीओ, कृषी अधिकारी लठार, गटशिक्षण अधिकारी भाकरे, पं.स. अभियंता निमजे, कृषी विस्तार अधिकारी गाडगे, शिक्षण विस्तार अधिकारी शालिनी रामटेके, पं.स. अभियंता (घरकुल) सागर वानखेडे, अभियंता इडपाते, पं.स. सदस्य वरखडे, मंगला सरोते, सेवानिवृत्त प्रभारी गटशिक्षण अधिकारी उईके, कृषी अधिकारी खोरगे, संतोष आगासे, प्रकाश क्षिरसागर, जामनेकर, आशा चव्हाण, राजेश जगणे, संजय गायकवाड, वेणुमाधव येल्लुरे, मलघाटे, आशिष मावळे, रामटेके, कल्पना भुजाडे तथा शाशकीय वाहन चालक मुन्ना बैस आदी. उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Wed Jun 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – दोनशेच्या वर लाभार्थ्यांनी घेतला मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ कामठी :- शिवराज्यभिषेक सोहळा व हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र 16 चे माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांच्या वतीने शिव छत्रपती नगर,हनुमान मंदिर जवळ कामठी येथे 5 व 6 जून ला दोन दिवसीय आयोजित मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण कार्यक्रमाला लाभार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com