राज्यपालांच्या हस्ते २०२४ मुंबई मॅरेथॉनला झेंडी

– स्पर्धकांमध्ये गीतकार गुलजार

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरून टाटा मुंबई ‘मॅरेथॉन एलिट’ स्पर्धेला झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्यपालांनी ‘चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटीज’ – दिव्यांग व्यक्तींची स्पर्धा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेला देखील झेंडा दाखवून रवाना केले.

गीतकार गुलजार यांनी यंदा ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत भाग घेतला.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. आमदार आशिष शेलार, पश्चिम नौसेना मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस अॅडमिरल संजय सिंह, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल एच. एस. काहलों, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, कार्यक्रमाचे आयोजक अनिल सिंह व विवेक सिंग आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये ६० हजार लोक सहभागी होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Law Students Move Bombay High Court Challenging Maharashtra Govt's Declaration Of Public Holiday For Ram Mandir Consecration On Jan 22

Sun Jan 21 , 2024
Mumbai :-Four law students have filed a PIL in the Bombay High Court challenging the Maharashtra government’s notification declaring January 22, 2024 a public holiday for the consecration of the Ram Mandir in Ayodhya. A special bench of Justices GS Kulkarni and Neela Gokhale has been constituted to hear the matter tomorrow. The petitioners are students from MNLU, Mumbai, GLC […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!