आदर्श महिला मंडळ द्वारे युवक कल्याण शिबीर संपन्न.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – जिल्हा क्रिडा अधिकारी नागपुर यांच्या सौजन्याने व आदर्श बहुउद्देशिय महिला मंडळ कांद्री व्दारे तीन दिवसीय युवक कल्याण विषयक चर्चासत्र शिबीर संपन्न झाले.
युवक कल्याण चर्चासत्र कार्यक्रमाचे उद्घाटन शशिकला बागडे, अध्यक्ष सेवा सहकारी औद्योगि क संस्था कांद्री यांच्या हस्ते तर दिप्ती समरीत अध्यक्षा ज्ञानज्योती महासंघ, हिरा भुते सचिव, विशाखा वंजारी कोषाध्यक्ष, माला भक्ते लेखा पाल आदीच्या प्रमुख उपस्थित करून शिबीराची सुरू वात करण्यात आली. याप्रसंगी रामटेक च्या समाज सेविका सुचित्रा वंजारी हयांनी कच्चा माल घेऊन आपला उद्योग सुरू करणे, फाईल तयार करणे, पापड तयार करणे, सेवई तयार करणे इतर छोट्या उद्योग धंद्या विषयी चर्चात्मक माहीती देत बँकचे अर्थसहाय्य मिळवुन स्वत:चा उद्योग सुरू करण्या विषयी मार्गदर्श न करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन जयश्री किरपान यांनी तर आभार योगिता ढबाले हयानी केले. शिबीराच्या यशस्विते करिता आदर्श बहुउद्देशिय महि ला मंडळाच्या अध्यक्षा कुसुम  किरपान, सचिव प्रभा कारेमोरे कोषाध्यक्ष जयश्री किरपान, उपाध्यक्षा योगिता ढबाले, सदस्या चंद्रकला धोपटे, सुनीता वंजारी, अर्चना बोंद्रे आदीने सहकार्य केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!