संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन मागे पश्चिमेस १ कि.मी. अंतरावर पटेल नगर पिपरी कन्हान येथील किराणा दुकानाचे सटर चे कुलुप तोडुन रात्री अज्ञात चोराने नगदी वीस हजार रूपयाची चोरी करून पसार झाल्या ने दुकानदाराच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसानी अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.
पटेल नगर कन्हान रहिवासी सतिश दुधनाथ तिवारी वय ४५ वर्ष राह. पटेल नगर कन्हान यांनी आपले किराणा दुकान रविवार (दि.५) मे ला रात्री ८ वाजता बंद करून कुलुप लावले. ते दररोज प्रमाणे सोमवार (दि.६) मे ला सकाळी ५ वाजता दुकान उघड ण्याकरीता गेले असता दुकानाचे शटर हे बाहेर निघाले ले दिसले व दोन्ही कुलुप वाकवलेले दिसल्याने दुकान उघडुन दुकानाचे आत जावुन काउंन्टर उघडुन बघितले असता त्यात ठेवलेले चिल्लर ५,००० रूपये व एका ग्राहका कडुन उधारी मिळालेले १५,००० रूपये असे एकुण २०,००० रूपये अज्ञात आरोपीने चोरून नेल्या ने फिर्यादी दुकानदार सतिश तिवारी यांचे तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरूध्द कल म ४५७, ३८० भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद करून कन्हान पोस्टे चे पोउपनि श्री महादेव सुरजुसे हे पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.