कामठीत विविध ठिकाणी एटीएस पथकाची धडक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 कामठी :- कामठी शहरातील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील सैलाब नगर, बी बी कॉलोनीसह आदी ठिकाणी तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कादर झेंडा, जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळ,असलेल्या काही ठिकाणी आज 24 सप्टेंबर ला सकाळी 7 वाजेपासून नागपूर एटीएस पथक (आतंकवाद विरोधी दस्ता)पथकाने भेटी दिल्याच्या चर्चेला उधाण आले असून या भेटीतून पीएफआय संघटनेशी निगडित असलेल्या सदस्यांचे शोध घेत असल्याचे सांगण्यात येते.

वादग्रस्त संघटना पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने पुण्याला आपलं केंद्र बनवलं आहे, तसंच एसडीपीआय जालना आणि औरंगाबादमध्ये सदस्य नोंदणी करत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून हा अलर्ट देण्यात आला आहे. पीएफआय आणि एसडीपीआय अत्यंत गुप्त पद्धतीने आखणी करत आहे, ज्यामुळे संशयास्पद घटनांचा धोका निर्माण झाला आहे.तर एनआयएने अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणी केलेल्या तपासामध्येही काही धक्कादायक खुलासे केले आहेत. एनआयएला या प्रकरणातल्या आरोपींची चौकशी करताना प्राप्त संघटनांची भूमिका असल्याची माहिती मिळाली आहे. या दोन्ही संघटना सध्या संशयास्पद घटनांमध्ये असल्यामुळे एनआयएच्या रडारवर आहेत.

पीएफआयची तीन लाख फॅमिली अकाऊंट आहेत. या खात्यांमध्ये फॅमिली मेन्टेनन्सच्या नावाखाली कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबियातून 500 कोटी रुपये आले आहेत, असा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे. ही रक्कम मनी ट्रान्सफरच्या माध्यमातून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवण्यात आली आहे. या खात्यांपैकी एक लाख खाती पीएफआयच्या सदस्यांची तर उरलेली दोन लाख खाती त्यांच्या नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींची आहेत. या खात्यांमध्ये येत असलेल्या पैशांचा वापर कशासाठी होत आहे, याचा तपास एनआयए करत आहे.तर कामठीत सुदधा या पीएफआय संघटनेचे जाळे जुळले असल्याच्या गुप्त माहितीवरून आज कामठी शहरात आतंकवाद विरोधी दस्ता पथकाने भेट देत बरेच वेळेपर्यंत चौकशी करून सकाळी 7 वाजता आलेले हे पथक सायंकाळी 7 वाजता परतले असल्याचे बोलले जाते.

NewsToday24x7

Next Post

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान २६ सप्टेंबरपासून

Sun Sep 25 , 2022
टास्क फोर्स समितीच्या बैठकमध्ये निर्णय : प्रत्येक झोन मध्ये आरोग्य शिबिर नागपूर :-  राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील अठरा वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी नवरात्रि कालावधीत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत दहाही झोननिहाय विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत. या अभियानाची अंमलबजावणी संदर्भात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com