चंद्रपूर :- १,३३,५०१ रुपयांची थकबाकी असणाऱ्या भानापेठ येथील वोडाफोन – आयडिया आउटलेट व नानुसेठ यांच्या मालकीच्या हवेली गार्डन,अपेक्षा नगर येथील प्रत्येक ५४ हजार थकबाकी असणाऱ्या २ मालमत्तांना मनपा कर वसुली पथकाने सील केले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊनही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.
सील केलेल्या मालमत्ताधारकांना यापुर्वी अनेकदा कर भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे जप्तीपूर्वीची नोटीस सुद्धा देण्यात आली होती. त्यानंतरही मोठी मुदत मिळूनही त्यांच्याद्वारे कराचा भरणा करण्यात आला नव्हता. कर भरणा करण्याची जबाबदारी टाळल्यामुळे या मालमत्तांना टाळे ठोकण्यात येत आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची १४ पथके सातत्याने कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे.दरम्यान मालमत्ता कराच्या शास्तीत २५ टक्के सूट मिळण्याची अंतिम तारीख ३१ मार्च असुन मालमता धारकांनी कराचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येतो त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येत आहे. सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,पथक प्रमुख अतुल भसारकर,फारुख शेख,मुकेश जीवने,श्रीकांत होकाम यांनी केली.