संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बहुजन विद्दूत कर्मचारी सहकारी पत संस्था मर्यादित कामठी तालुका ची 17 वी वार्षिक आमसभा आज दुपारी बारा वाजता येरखेडा मार्गावरील आकांक्षा स्टडी सर्कल सेंटर येथे संपन्न झाली..
सदर आमसभेला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र शासन विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त मधुकर सुरवाडे, विशेष अतिथी म्हणून भगवान नाईक, जीवन डहाट ,एसआयएम अली हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून सहकार विभाग कामठी येथील सहकार अधिकारी दिलीप बाबरे., संदीप कोलकुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर आमसभेत सभासदांच्या एकूण 22 गुणवंत पाल्यांच्या मेडल मिठाई व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर सभासद बंधू आणि भगिनी यांना स्वरूची भोजन देण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर सभेला संस्थेचे खालील पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष
दिलीप आवळे ,सचिव
मनोज मेश्राम , उपाध्यक्ष
पांडुरंग मामुलकर, संचालक अशोक आवरकर,युवराज नाईक, कल्पना मोरघडे ,संचालिका अनिता कोत्रे ,तज्ञ संचालक प्रकाश वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सचिव मनोज मेश्राम यांनी केले.