३० जून पूर्वी ऑनलाईनरित्या मालमत्ता कर भरल्यास १५ टक्के सूट

– आतापर्यंत 30.74 कोटी रुपये जमा : सर्वाधिक लाभार्थी लक्ष्मीनगर झोनमध्ये

नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मालमत्ता कराची चालू वर्षाची पूर्ण रक्कम एकमुस्त ऑनलाईन माध्यमातून नागपूर महानगरपालिका निधीत जमा करणाऱ्या मालमत्ता धारकास कर रक्कमेत १५ टक्के सूट दिली जाणार आहे. याशिवाय ऑफलाईन माध्यमातून कर भरणाऱ्या मालमत्ता धारकास १० टक्के सूट देण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व ऑनलाईन पेमेंट सुविधेचा देखील वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

सदर योजनेबाबत माहिती देताना उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. त्यानुसार, ३० जून २०२३ पूर्वी चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कर रक्कम ऑनलाईन पेमेंट पद्धतीने नागपूर महानगरपालिका निधीत जमा केल्यास एकूण १५ टक्के सूट दिली जाणार आहे. तर ऑफलाईन पद्धतीने केल्या १० टक्के सूट दिली जाणार आहे. १ एप्रिलपासून ही योजना सुरू झालेली असून योजनेद्वारे आतापर्यंत 30.74 कोटी रुपये कर भरणा करण्यात आलेला आहे. यामध्ये लक्ष्मीनगर झोन आघाडीवर असून झोनमधील मालमत्ता धारकांनी योजनेचा लाभ घेत ५.५ कोटी रुपये मनपा निधीत जमा केले. यापोठोपठ हनुमान नगर झोनमधून 4.09 कोटी रुपये, मंगळवारी झोनमधून 4.13 कोटी रुपये, नेहरूनगर झोनमधून ३.56 कोटी रुपये, धरमपेठ झोनमधून 3.10 कोटी रुपये, आशीनगर झोनमधून २.92 कोटी रुपये, लकडगंज झोनमधून २.72 कोटी रुपये, धंतोली झोनमधून 2.51 कोटी रुपये, गांधीबाग झोनमधून १.21 कोटी तर सर्वात कमी सतरंजीपुरा झोनमधून 94 लक्ष रुपये मालमत्ता कर जमा झालेला आहे.

या योजनेद्वारे मागील वर्षात दहाही झोनमधून 30 जुन 2023 पर्यंत 42.66 कोटी रुपये मालमत्ता कर मनपा निधीत जमा करण्यात आलेला होता. २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षातही जास्तीत जास्त मालमत्ता कर धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व ऑनलाईन सुविधेचा वापर करून मनपा निधीत मालमत्ता कर रक्कम जमा करावी, असे आवाहन उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांनी केले आहे.

आजपर्यंत ऑनलाईन सुविधेचा वापर करुन 25,317 नागरिकांनी या योजने अंतर्गत मनपा निधीत मालमत्ता कर जमा करुन रु 1.56 कोटीचा लाभ घेतला व ऑफ लाईन सुविधेचा वापर करुन 48,846 नागरिकांनी ह्या योजने अंतर्गत मनपा निधीत मालमत्ता कर जमा करुन रु. 1.26 कोटीचा लाभ घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor honour top Plastics Exporters with Excellence Awards

Sat Jun 8 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais presented the Export Excellence Awards of the Plastics Export Promotion Council (PLEXCONCIL) to 75 plastics exporters at an awards function held at NESCO, Goregaon Mumbai on Fri (7 Jun). The Governor presented the Lifetime Achievement Award to M P Taparia, Chairman of Supreme Industries and a special award to former Chairman of PLEXCONCIL Arvind […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com