शुक्रवारी बाजारातुन 50 हजार रुपये गेले चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मागील काही दिवसांपासून जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आठवडी दिवस असलेल्या शुक्रवारी बाजारातुन हातचालाखीने महिलेच्या पर्स मधून पैसे चोरी होणे हे नित्याचेच झाले आहे मात्र आज गांधी चौकातील एका रहमान कुलर नामक दुकानातील एका कर्मचाऱ्यांच्या पिशवीत ठेवलेले 50 हजार रुपये तीन अज्ञात महिलांनी हात चलाखीने चोरून नेल्याची घटना आज दुपारी 1 वाजता घडली असून यासंदर्भात पीडित फिर्यादी श्रावण निर्मलकर वय 54 वर्षे रा छत्रपती नगर कामठी ने जुनी कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हा गांधी चौकात असलेल्या रहमान कुलर दुकानात मिस्त्री म्हणून कार्यरत असून घराच्या बांधकाम करण्याहेतु आज दुपारि 1 दरम्यान सदर फिर्यादीने नजीकच्या बँक ऑफ महाराष्ट्र मधून 50 हजार रुपये निकासी करून पिशवीत भरून दुकानात आले असता तीन अज्ञात आरोपी महिला दुकानात येऊन टीन विकत घेण्याचा बहाणा करून सांगीतलेली किमत अधिकचे असल्या कारणावरून परत गेल्या काही वेळेनंतर सदर फिर्यादिने पिशवी बघितले असता पिशवी पैश्याविना खाली होता यासंदर्भात शोधाशोध घेतला असता पैसे चोरी झाल्याचे निष्पन्न होताच पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्य निर्मलधाम में पढ़ाए जाएंगे वेद - शास्त्र

Sat May 25 , 2024
नागपुर :- विश्व जागृति मिशन नागपुर के तत्वावधान आचार्य सुधांशु महाराज की प्रेरणा से दिव्य निर्मल धाम सुराबर्डी अमरावती रोड में वेद, शास्त्र आदि की पढ़ाई व संस्कार देने के उद्देश्य से नि:शुल्क महर्षि वेदव्यास गुरुकुल विद्यापीठ आरंभ किया जाएगा. इसकी तैयारियां की जा रही हैं. इसमें विद्यार्थियों की पढ़ाई पूर्णतः निःशुल्क होगी. विद्यार्थियों को आवास व भोजन की भी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com