देशातील 146 धरणांमध्ये सद्यस्थितीत 59.503 अब्ज घनमीटर पाणीसाठा

नवी दिल्ली :- केंद्रीय जल आयोग साप्ताहिक आधारावर देशातील 146 धरणांच्या जिवंत पाणी साठवण स्थितीचे निरीक्षण करते.यापैकी 18 धरणे जलविद्युत प्रकल्पातील आहेत या धरणांची एकूण प्रत्यक्ष साठवण क्षमता 34.960 अब्ज घनमीटर आहे.146 धरणांची एकूण जिवंत साठवण क्षमता 178.185 अब्ज घनमीटर आहे. दिनांक 13.07.2023 रोजी जारी केलेल्या धरण जलसाठवण संदर्भातील विवरणानुसार ,या धरणांमध्ये उपलब्ध असलेला जिवंत पाणीसाठा 59.503 अब्ज घनमीटर असून एकूण जिवंत साठवण क्षमतेच्या 33% आहे. तथापि, मागील वर्षी याच कालावधीमध्ये या धरणांमध्ये उपलब्ध जिवंत जलसाठा 69.726 अब्ज घनमीटर होता आणि गेल्या 10 वर्षांची या जलसाठ्याची सरासरी 53.904 अब्ज घनमीटर होती.अशाप्रकारे, 13.07.2023 च्या विवरणानुसार, 146 धरणांमध्ये उपलब्ध असलेला जिवंत साठा हा गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील जिवंत साठ्याच्या 85% आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या 110% इतका आहे.

एकूण साठवण स्थिती संपूर्ण देशात गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा कमी आहे मात्र मागील दहा वर्षांच्या याच कालावधीतील सरासरी साठ्यापेक्षा ती चांगली आहे.

देशात उपलब्ध असलेल्या जिवंत पाणीसाठ्याची स्थिती

146 धरणांच्याउपलब्ध डेटाच्या आधारे दिनांक 13.07.2023 च्या जलाशय साठ्याच्या विवरणानुसार,देशात निर्माण होणाऱ्या अनुमानित एकूण जिवंत पाणीसाठा 257.812 अब्ज घनमीटरच्या तुलनेत देशात अनुमानित जिवंत पाणीसाठा 83.816 अब्ज घनमीटर आहे .

संबंधित कालावधीसाठी मागील वर्षाच्या तुलनेत (% मध्ये) चांगला पाणीसाठा असलेली राज्ये: हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंड, ओदीशा , उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड.

संबंधित कालावधीसाठी मागील वर्षीप्रमाणेच समान जलसाठा (% मध्ये) असलेली राज्ये: गुजरात.

संबंधित कालावधीसाठी गेल्या वर्षीपेक्षा कमी जलसाठा (% मध्ये) असलेली राज्ये: पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा (दोन्ही राज्यांमधील दोन एकत्रित प्रकल्प), आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चांद्रयान मोहीम जागतिक स्तरावर भारताने घेतलेली मोठी झेप ठरेल; भारताच्या कोविड लसीच्या यशोगाथेनंतर आता चांद्रयान-3 ही मोहीम भारताच्या स्वदेशी क्षमतांचा पुनरुच्चार करतानाच जागतिक पटलावर भारताचे स्थान अधिक भक्कम करेल - केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह

Fri Jul 14 , 2023
– हैदराबाद येथे भारत आणि ब्रिटन यांच्या 11 व्या इंडिया अलायन्स वार्षिक परिषद 2023 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले संबोधित नवी दिल्ली :-केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की कोविड लसीनंतर, चांद्रयान-3 ही मोहीम म्हणजे जागतिक क्षेत्रात भारताने घेतलेली मोठी झेप ठरेल आणि भारताच्या कोविड लसीच्या यशोगाथेनंतर आता चांद्रयान-3 ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com