अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत.

याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंत्री तटकरे यांनी केले आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

Tue Jul 16 , 2024
मुंबई :- कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रात केलेल्या यशाबद्दल व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com