नागपूर:- फिर्यादी योगश ओमकार कोडवते, वय २३ वर्षे, रा. प्लॉट नं. १४२, गणेश नगर, दाभा, गिट्टीखदान, नागपूर यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क. एम.एच. ३१ एफ. व्ही ३३१२ किंमती २०,०००/-रू, ची पोलीस ठाणे गिट्टीखदान हहीत, जाफर नगर हॉकी ग्राऊंड, प्लॉट नं. १२३, येथे भावाचे घरासमोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाने तपासात अंबाझरी पोलीसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून गुन्हयातील चोरी गेलेली मोटरसायकल अंबाझरी बायपास रोड, डम्पींग यार्ड येथुन ताब्यात घेतली तसेच तेथे एक विना कर्माकाची सुझुकी अॅक्सेस मोपेड सुध्दा मिळुन आली होती. आरोपी मिळाले नव्हते. गिट्टीखदान पोलीसांनी तपासा दरम्यान शोध घेवुन एका विधीसंघर्षग्रस्त बालकास त्याचे पालकासमक्ष ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद वाहन चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. विधीसंघर्षग्रस्त बालकास अधिक सखोल विचारपूस केली असता, त्याने पोलीस ठाणे कळमणा हदीतुन सुलूकी अॅक्सेस मोपेड चोरीची कबुली दिली, विधीसंघर्षग्रस्त बालकाचे ताब्यातुन दोन गुन्हे उघडकीस आणून दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी राहुल मदने, पोलीस उप आयुक्त (परी. क. २), सुनिता मेश्राम, सहा. पोलीस आयुक्त (सदर विभाग), सुधीर नंदनवार, सहा. पोलीस आयुक्त (सिताबर्डी विभाग), यांचे मार्गदर्शनाखाली, अंबाझरी व गिट्टीखदान पोलीसांनी संयुक्तीकरित्या केली.