संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– भुगाव गावातील प्रत्यक्षात केली भात पिकाची पाहणी
कामठी :- नागपूर जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज दुपारी 12 दरम्यान कामठी तालुक्यातील भुगाव येथील शेतकरी पुंडलिक मेहर यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन भात या पीकाची बांध्यात प्रत्यक्ष रोवणी केली.तसेच गावातील नागरीक व शेतकरी वर्गातील लोकांशी संपर्क साधुन चर्चा करीत आस्थेने अडीअडचणी जाणून घेतल्या.तसेच शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले.
तसेच भुगाव ग्रामपंचायत कार्यालयात सर्व अंगनवाडी सेविका सोबत शासनाची अभिनव योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘या योजनेसंदर्भात चर्चा करून आढावा घेतला. तसेच या योजनेला गतिमान करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून या योजनेपासून एकही लाभार्थी वंचीत राहता कामा नये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेत भेट देत विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधले. व शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून शाळेतील मूलभूत सुविधाबाबत शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,सरपंच व पदाधिकारी यांना निर्देशित केले.
याप्रसंगी कामठी पंचायत समितीचे सभापती दिलीप वंजारी,सहाय्यक गट विकास अधिकारी रवींद्र उके,भुगाव ग्रा प सरपंच नितेश घुबडे, ग्रामपंचायत सदस्य,गावातील शेतकरी व नागरिकगण सह प्रभारी तालुका कृषी अधिकारी विजय नंदनवार,कृषी अधिकारी पंकज लोखंडे, कृषी अधिकारी संध्या मोकदम,कृषी विस्तार अधिकारी विकास लाडे,कृषी विस्तार अधिकारी गजानन खरपूरिया,पंचायत विस्तार अधिकारी प्रवीण गावंडे,आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे,कृषी पर्यवेक्षक मनीष माळोदे आदी उपस्थित होते.