अजितदादांचं ‘ते’ वाक्य काळजाला लागलं… सुप्रिया सुळे जाहीर सभेत म्हणाल्या, तो निर्णय पांडुरंगाचा…

बारामती :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका खासदार सुप्रिया सुळे यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. सुप्रिया सुळे यांनी अजितदादा यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते एक वाक्य बोलले होते. समोरचे येतील, भावूक होतील. म्हणतील, त्यांचं शेवटचं इलेक्शन आहे आणि रडतील. मला त्यांना सांगायचं हे इलेक्शन पहिलं दुसरं की शेवटचं हा निर्णय तुमचा नसेल. तर माझ्या पांडुरंगाचा असेल. तुमच्या या बुरसटलेल्या विचाराच्या आम्ही नांदी लागणार नाही, असं हल्लाच सुप्रिया सुळे यांनी चढवला.

बारामती येथील जाहीर सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार दिवसातून तीन चार सभा करतात. एवढी एनर्जी येते कुठून? असं मला लोक विचारतात. मी त्यांना सांगते, त्यांच्या टॉनिकचं नाव महाराष्ट्र आहे आणि त्यांची एनर्जी मायबाप जनता आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांना साथ द्याल, तोपर्यंत त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे येऊ द्या सर्व. बोलू द्या सर्व काही. काही लोक आता व्हिडीओ दाखवत आहेत. आम्ही पवार साहेबांना संपवणार असं म्हणत आहेत. जोपर्यंत तुम्ही पवारांची ढाल आहात. तोपर्यंत कोणी मायका लाल त्यांना संपवू शकत नाही, असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिला.

काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात

मला सर्व काही माहीत आहे. मलाच सर्व काही माहीत आहे. काही गोष्टी अश्या असतात, त्या पोटातचं ठेवायच्या असतात. माझं पोट मोठं आहे. कारण नाती तोडायला नाही तर जोडायला कष्ट लागतात. माझ्या आजींनी जोडून ठेवलेली नाती दिल्लीतले सुई घेऊन तोडायचा प्रयत्न करत आहेत, असा दावा करतानाच माझं चिन्ह बदललं आहे. त्याबद्दल तुम्हाला सांगितलं पाहिजे. आता माझं चिन्ह तुतारी आहे. हे लक्षात ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं.

एक रुपयाचा कढीपत्ता

आपल्या विचारचं सरकार केंद्रात असेल तर विकास होतो असं म्हणता तर, सांगली आणि सोलापूरला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. तिथं पाण्याचा प्रश्न सुटला का? बाकीचे प्रश्न सुटले का? या दोन जिल्ह्याचा काय विकास झाला? सोलापूरमध्ये तर एक रुपयांचा कढीपत्ता, सोलापूरचा खासदार बेपत्ता असं म्हटलं जातं, अशी टीकाही त्यांनी केली.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘त्यावेळी’ पडद्यामागे काय घडत होतं? उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Sun May 5 , 2024
– भाजप-शिवसेना युतीचा इनसाईड इतिहासच सांगितला अलिबाग :- शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप पक्षावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीचं नातं नेमकं कसं होतं, राजकारणात पडद्यामागे काय-काय घडामोडी घडल्या होत्या? याबाबतचा गौप्यस्फोट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com