युथ काटोल, धापेवाडा संघाला विजेतेपद, खासदार क्रीडा महोत्सव: हॉलिबॉल स्पर्धा

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारले्ल्या खासदार क्रीडा महोत्सवातील व्हॉलिबॉल स्पर्धेत युथ स्पोर्ट्स काटोल आणि श्री कोलबास्वामी स्पोर्ट्स अॅकेडमी धापेवाडा संघाने पुरुष व महिला गटातील विजेतेपद पटकावले.

रेशीमबाग मैदानामध्ये व्हॉलिबॉल स्पर्धा पार पडली. शनिवारी (ता.27) रात्री स्पर्धेची अंतिम लढत झाली. पुरूष गटात युथ स्पोर्ट्स काटोल संघाचा सामना रॉयल व्हॉलिबॉल अॅकेडमी संघासोबत झाला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक सामन्यात युथ स्पोर्ट्स संघाने 23-25, 25-13, 25-15, 25-23 अशा गुणांसह रॉयल संघाला पराभवाचा धक्का देत विजेतेपदावर नाव कोरले. महिलांची अंतिम लढत श्री कोलबास्वामी स्पोर्ट्स अॅकेडमी धापेवाडा आणि समर्थ व्यायामशाळा नागपूर यांच्यात झाली. या सामन्यात धापेवाडा संघाने 25-14, 21-25, 25-14, 25-18 अशा गुणफरकाने समर्थ संघाला नमवून विजेतेपद पटकावले.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत पुरूष गटात समर्थ व्यायामशाळा आणि महिलांमध्ये नागपूर सिटी पोलिस संघाने विजय मिळविला. पुरूष गटातील सामन्यात समर्थ संघाने पुलगाव संघाचा 25-22, 27-25 असा दोन सेटमध्ये पराभव केला. तर महिलांच्या सामन्यात नागपूर सिटी पोलिस संघाने हिंगणघाट संघाला 25-22, 25-20 ने मात दिली.

विजेता, उपविजेता आणि तिसऱ्या स्थानावरील संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे समन्वयक माजी नगरसेवक विजय (पिंटू) झलके, कन्वेनर सुनील मानेकर, नितीन कानोडे, सोनाली पठारडकर, सौरभ रोकडे, सुनील हांडे आदी उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

कर्तव्यनिष्ठेने, देशहिताच्या विचाराने कार्य केल्यास प्रगती शक्य - ना.सुधीर मुनगंटीवार

Sun Jan 28 , 2024
– प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराचे वितरण Your browser does not support HTML5 video. चंद्रपूर :- कोणताही जिल्हा किंवा देश घडवायचा असेल, समाजाची प्रगती साधायची असेल तर सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे नितांत गरजेचे आहे. कर्तव्यनिष्ठेने, देशहिताच्या विचारांनी कार्य केल्यास जिल्हाच काय देशाचीही प्रगती संभव आहे, असे ठाम प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com