उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर :-  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट दिली व विविध माध्यम प्रतिनिधींसोबत मनमोकळा संवाद साधला.

शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक हेमराज बागुल यांनी प्रारंभी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुयोग येथील व्यवस्थेची पाहणी केली व पत्रकारांशी अनौपचारिक वातावरणात मनमोकळा संवाद साधला.

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असून विविध योजनांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मदतीबाबत माहिती त्यांनी दिली. राज्यातील विविध विषय तसेच प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

कांदा व इथेनॉलबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दूध दराच्या प्रश्नासंदर्भात मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्रमोद हिंदुराव, संजय खोडके, माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर येथे आगमन

Tue Dec 12 , 2023
नागपूर :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दुपारी आगमन झाले. ते तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे, सहायक पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते.राजभवनातही त्यांचे स्वागत कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार यांनी केले. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता राजभवन येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!