राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

नागपूर :- जिल्ह्यातील कार्यरत शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी त्यांच्या शाळा व महाविद्यालयातून सन 2021-22 या सत्रातील फेब्रुवारी व मार्च 2022 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून विभागीय बोर्ड, तालूका, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी कागदपत्रासह प्रस्ताव सहायक आयुक्त समाज कल्याण, नागपूर यांचेकडे तत्काळ सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापकांनी अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, श्रध्दानंद पेठ नागपूर येथे संपर्क साधावा.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com