रविकांत रागीट महाविद्यालयाचा विशेष श्रम संस्कार शिबिर.
रामटेक – कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक संलग्नित रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय ,रामटेक प्राचार्य रविकांत रागीट यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिर नगरधन येथे आयोजित करण्यात आले आहे यात , सहा.प्रा.अतुल गाळेराव (योग व समग्र स्वास्थ विभाग)क.का.स.वि. रामटेक यांनी योगासने प्राणायाम घेऊन समृध्द आरोग्यासाठी योगशास्त्र चे महत्व पटवून दिले, त्यानंतर नगरधन गावचे सरपंच प्रशांत कामडी यांच्या उपस्थितीत ग्राम स्वच्छता अभियान घेऊन विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा .ज्ञानेश्वर नेवारे, प्रा.अनिल मिरासे, प्रा. मयुरी टेंभुर्णे यांनी परिश्रम घेतले……… नगरधन चौक येथे पल्लवी गजभिये सह त्यांच्या टीम ने अतिशय सुंदर दारू मुळे कशी कुटंब ची राखरांगोळी होते घर कसे उध्वस्त होते यावर आधारित पथनाट्य चे सादरीकरण केले. यावेळी बघणाऱ्यानी त्यांचे कला गुणांचे कौतुक केले हे विशेष.