जलकलश यात्रेने येरखेडा गाव दुमदुमले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- श्रावण मासाच्या पावन पर्वावर आज 17 ऑगस्ट गुरुवारला येरखेडा येथील शिवपंचायत मंदिरापासून भजन मंडळ सोबत भव्य जल कलश यात्रा काढण्यात आली. ही जलकलश यात्रा येरखेडा गावातील मुख्य मार्गााने फिरविण्यात आली. यावेळी ‘जय श्रीराम’ नामाचा गजर करण्यात आला. ‘जय श्रीराम’ नामाच्या गजराने संपूर्ण येरखेडा गाव दुमदुमले. या जलकलश यात्रेत मौदा येथील सुरसंगम सिंदु आश्रम (धर्मापुरी) चे महत्त बालकदास महात्यागी प्रामुख्याने उपस्थित होते.

ही भजन मंडळी व जलकलश यात्रा शिव पंचायत मंदिरातून प्रस्थान होताच हर हर महादेव,बम बम भोले,बोलो शंभू महादेव की जय असा जयघोष करीत भजन मंडळाच्या टाळ मृदुगांसह ढोल ताशाच्या गजरात आणि भजनाच्या स्वरात सहभागी महिलांनी जलकलश यात्रा काढली होती.शिव पंचायत मंदिर येथे महत्त् बालकदास महात्यागी यांच्या हस्ते जलकलश यात्रेची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर सर्व भाविक महिला या जलकलश यात्रेत सहभागी झाले.यात्रेमध्ये भजनी मंडळानी भजन म्हणत गावातील वातावरण भक्तिमय केले.

या भजन मंडळ व जलकलश यात्रेत प्रामुख्याने महत्त् बालकदास महात्यागी ,माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, किशोरी यादवराव भोयर,अनुराधा सुरेश भोयर,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे,येरखेडा ग्रा प सरपंच सरिता रंगारी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कुणाल इटकेलवार,पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी,खैरी ग्रा प चे माजी सरपंच किशोर धांडे,पंढरी आंबाळकर,रमेश गवते, बबनराव काळे,वसंतराव काळे,अजाबराव उईके, ओमप्रकाश कुरील,चंद्रशेखर बनसिंगे, भास्कर बनसिंगे, राजा बनसिंगे, येरखेडा ग्रा प सदस्य अनिल पाटील, गजानन तिरपुडे, अनिल भोयर,गीता परतेकी,रोशनी भस्मे,पूजा भोयर,दीपाली वानखेडे, घनश्याम नवधींगे,बाल्या लूटे, प्रवीण भागदे,अमित भोयर, मधुकर ढोले,वाघ गुरुजी,प्रदीप शेंडे, बाबा पूजरवार,दीपक पांडे यासह समस्त गावकरी व भजन मंडळी सहभागी होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे काम वेळेत पूर्णत्वाचे नियोजन करावे - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Thu Aug 17 , 2023
मुंबई :- राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे 12 लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाला गती देऊन कालबद्ध पद्धतीने कामाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मुंबई विद्यापीठ कलिना परिसरातील नवीन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाची पाहणी आज मंत्री  पाटील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com