यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात बदल

पुणे :- यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवारपासून बदल करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या व जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन लेनमध्ये तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन लेनमध्ये वाहतूक करावी.

या वाहतूकीच्या बदलामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Reaction to the Interim State Budget ’24 :: Dr. Dipen Agrawal President Chamber of Associations of Maharashtra Industry and Trade (CAMIT)

Wed Feb 28 , 2024
– The Interim Budget is a Fine Balance between Electoral Populism and Fiscal Discipline Nagpur :- The second budget of Eknath Shinde as Chief Minister and first by Ajit Pawar as Finance Minister in this Government, has a clear focus on infrastructure and development. Maharashtra is indeed one of the leading states in terms of industrialization and overall development. Progress of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com