मुले चोरणारी टोळी असल्याच्या अफवेने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

मुले चोरणारे समजून लोकांनी दिला चोप ; पोलिसांनी चार जणांना केली अटक 

चार पैकी दोघांवर विरुद्ध गुन्हे दाखल

गोंदिया :- सध्या मुले चोरणारी टोळी फिरत असल्याने सगळी कळे मोठी दहशत पाहायला मिळत आहे. अश्यातच गोंदिया शहरात मुले चोरणारी टोळी असल्याची अफवा होताच सावराटोली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात अनोळखी किंबहुना संशयित रित्या फिरणाऱ्या चार जणांना परिसरातील रहिवाशांना चांगलाच चोप दिला. असुन गोंदिया शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या चारही जणांना ताब्यात घेतले. सावराटोली येथील जगन्नाथ मंदिर परिसरात काही अनोळखी व्यक्ती फिरत होती. ही माहिती स्थानिकांना मिळताच स्थानिक यांनी घटनास्थळ त्या चाैघांची चांगली धुलाई केली. तथापि, या घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना मिळताच घटनास्थळ गटात त्या संशयित चाैघांनाही ताब्यात घेतले. या घटनेने शहरासह जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.

गोंदिया शहरातील सावराटोली परिसरात घडलेली घटना ही खरी असुन या घटनेतील चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चाैकशी केली असता त्या पैकी दोघांवर नागपूर येथे पोलिसात चोरी चे गुन्हे दाखल आहेत. या चौघांन पैकी नागपूर येथील रामचंद्र दांडेकर व भंडारा जिल्हयांतील नवेगाव येथील सत्यपाल शेंडे असे हे दोघे चोर असुन यांच्या विरोधात नागपूर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. तर दोन हे पर राज्यातील असुन त्या पैकी राजेश तुम हा आन्धप्रदेश येथील आहेत. तर अशोक मिस्त्री हा छत्तीसगड राज्यातील असून हे दोघे हि मतिमंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MAHARASHTRA DIRECTORATE WINS THE BEST NCC DIRECTORATE ; TROPHY AT ALL INDIA VAYUSAINIK CAMP

Sat Oct 8 , 2022
Nagpur – The All India Vayusainik Camp for the year 2022 was conducted at Jodhpur from 24 Sep 22 to 05 Oct 22. Teams from all the seventeen Directorates of the National Cadet Corps from across India participated in the competition. The Maharashtra Directorate team comprised of 38 Cadets and 02 Associate NCC Officers. The cadets participated in various competitions […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com