नागपूर :- जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्त विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशन व तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक फार्मसिस्ट डॉ. चंद्रशेखर डोईफोडे (प्राचार्य-तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी), कार्यक्रमाचे अध्यक्ष फार्मसिस्ट हरिश गणेशानी (कार्यकारी सदस्य – महाराष्ट्र स्ट्रेट फार्मसी कौन्सिल) विशेष अतिथी श्रीकांत दुबे (निमंत्रित सदस्य -M.S.C.D.A.) फार्मसिस्ट सोनाली पडोळे (निमंत्रित सदस्य-महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल) फार्मसिस्ट विक्रांत चिलाटे (प्राचार्य-तायवाडे इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसी) फार्मसिस्ट निखिल भुते (मुख्य संयोजक-विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशन) व फार्मासिस्ट क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.चंद्रशेखर डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले, हरीश गणेशानी यानी आपल्या मार्गदर्शनात जागतिक औषधीनिर्माण दिनाचे महत्व सांगितले. श्रीकांत दुबे यांनी फार्मसी क्षेत्रात येणाऱ्या अडचण ला तोडगा काढावा यांचे मार्गदर्शन दिले, तसेच सोनाली पडोळे यांनी महिला फार्मसिस्ट ला मार्गदर्शन केले. निखिल भुते यानी प्रास्ताविक मध्ये विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशन द्वारा झालेल्या कार्याची माहिती व जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी फार्मसिस्ट गीता लोधी यांनी (पीएचडी) उपाधी पूर्ण केल्याबद्दल विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशन द्वारा सत्कार करण्यात आला. मनीषा वालदे यांनी कार्यक्रमांचे संचालन केले व आभार प्रदर्शन प्राचार्य विक्रांत चिलाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रिया ठाकरे, मोहम्मद शोएब, शरद भंडारकर, प्रीती भोयर, कमलेश माचेवार यांनी परिश्रम केले.