समाजाबद्दल भडकावू वक्तव्य करणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

काटोल :- दिनांक २३.०५.२०२४ रोजी पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत कलम १५३ (अ), ५०५ (२) भादवि सहकलम ३(ii), (iv), (vii), (xv), 5 महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ पिपल्स सोशल बायकॉट (प्रिवेन्शन, प्रोबिशन, अॅन्ड रिड्रेसल) अॅक्ट २०१६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये आरोपी नामे- राहुल विरेंन्द्र देशमुख वय ५० वर्ष रा देशमुख पुरा काटोल या आरोपीने एक पॉम्प्लेट ज्यामध्ये एक पुर्ण समाज बहिष्कृत करून त्यांना हद्दपार करायचे या आशयाचा मजकुर छापुन या कामासाठी लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने जे पॉम्प्लेट छापले होते त्याचा उ‌द्देश हा पुर्णपणे सांप्रदायिक आणि एका समाजाच्या विरोधात होता.

आरोपी राहुल देशमुख याच्या गुन्हेगारी अभिलेखामध्ये विनयभंग, सार्वजनिक मालमत्ता विदुपिकरण, अश्लील शिवीगाळ करणे, गैरकाय‌द्याची मंडळी जमवुन लोकांची अडवणुक करणे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ८ गुन्हे दाखल आहेत. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन आरोपी राहुल देशमुख याला पोलीस स्टेशन काटोल यांनी त्याच्या राहत्या घरातुन अटक केले. व आज मा. प्रथम वर्ग न्यायालय काटोल येथे हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपी कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर सांप्रदायिक कृत्म करणार नाही, तोच कायदा व सुव्यवस्था विपठविणार नाही या अटीवर जामीन मंजूर केला.

नागपुर ग्रामीण पोलीसांमार्फत सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येत आहे कि, कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही समाजाच्या विरूध्द भडकावु वक्तव्य करू नये असे केल्यास त्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य, यांचे स्पष्टीकरण

Sat May 25 , 2024
मुंबई :- मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024शी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com