संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 15 – आज 15 मे जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने आजनी गावातील गणपती देवस्थान परिसरातील आनंद उद्यान परिसरात वीर बजरंग क्रीडा मंडळाच्या लहान खेळाडूंनी श्रमदान करून संपूर्ण उद्यानाची स्वच्छता केली. येत्या पावसाळ्यात अजून विविध प्रकारचे वृक्ष लावून संवर्धन करण्याचा त्यांचा मानस आहे.
प्रोत्साहन आणि मार्गदर्शन जीवन विघे ( पोलीस ) आणि लिलाधर दवंडे ( कामगार कवी) व रोहित जीवतोडे यांनी केले.
निदान अशा एखाद्या दिनाचे औचित्य साधून पर्यावरण जागृती करण्यात यावी हा मोलाचा संदेश यातून दिला गेला आहे. या उपक्रमात मोहित मिरासे, वेदित निशाणे, प्रणय मोहोतकार, अभिषेक दवंडे, तुषार वानखेडे, अनिकेत दवंडे, साहिल पाली, दादू गायकवाड, पियूष गायकवाड, आयुष शाहू, आदी खेळाडू सहभागी झाले होते.