नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई :- पक्षाकडून काय मिळेल याचा विचार न करता आगामी 2-3 महिन्यात नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा, प्रत्येक बूथवर नवीन मतदार नोंदवा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पुणे येथे केले. प्रदेश भाजपाच्या अधिवेशनात बावनकुळे बोलत होते. राज्याचे प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सह प्रभारी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, प्रदेश पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे यांनी सांगितले की,देवेंद्र फडणवीस‌ यांनी मोठ्या परिश्रमाने मराठा आरक्षणाच्या कायद्याचा मसुदा तयार केला, मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत.

उद्धव ठाकरे सरकारने मोदी‌ सरकारच्या 18 योजना बंद पाडल्या.ओबीसी समाजाचे परत गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आणले. महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवण्याचे पाप केले, असा घणाघातही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की,महाविकास आघाडी सरकार राज्यात आले तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडतील.राज्यात महायुतीचे‌ सरकार आले‌ तर विकासाचे डबल इंजिन धावणार आहे, हे आपण जनतेला सांगावे.

जिद्दीने संघर्ष करण्याचा आपला पिंड आहे, त्यामुळे आपण बूथ यंत्रणा मजबूत करून प्रत्येकाने नवे दहा मतदार मिळवण्यासाठी काम करायचे आहे.तसे झाले तर विधानसभा निवडणुकीत महायुती दोनशे पार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडला. विविध लोककल्याणकारी योजना सादर केल्याबद्दल राज्यातील महायुती सरकारचे अभिनंदन करणारा ठराव मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलार यांनी मांडला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयसर ट्रकची मोटरसायकलला धडक तरुण ठार

Mon Jul 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर- जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील खापरखेडा टी पॉइंट वर नागपूर वरून कामठी कडे येत असलेल्या मोटरसायकला आयसर ट्रकने धडक दिल्याने तरुण ठार झाल्याची घटना आज रविवारी सकाळी साडेआठ वाजता सुमारास घडली. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एहतेश्याम अहमद इम्तियाज अहमद (२९) रा. इस्माइलपुरा कामठी हा ऑरेंज सिटी स्टील कंपनी खैरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!