संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपूर :- शतकापुर्वी जयभीम प्रवर्तक लोकप्रिय आमदार बाबु हरदास एल एन यांनी आपल्या तरूण सहकार्याच्या सोबतीने सहकारी तत्वावर बिडी कारखाना, धान्य किराणा कापड जिवनावश्यक वस्तु भांडार आरंभ केला होता त्यांच्या नावाने असलेल्या हरदास नगर लष्करीबाग येथे१९८८-८९ ला कृष्णराव बाबुराव मंडपे यांनी सहकार्यांच्या मदतीने संस्थेची स्थापना केली. आज संस्थेचे विकसित वटवृक्षाच्या रूपाने भरभराटीस आणले असंख्य गरजुंना आर्थिक आधारावर सुदृढ करण्याचा प्रयत्न नेहमीच स्फुर्तीवर्धक राहिला हि वाटचाल उत्तरोत्तर अधिक वाढत राहो असे भदंत नागदिपांकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
हरदास नगर अर्बन क्रेडिट को – ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची १७ वी सर्वसाधारण सभा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह येथे झाली, सभेच्या अध्यक्षस्थानी कृष्णराव बा. मंडपे होते. सभेत विषयपत्रिकेनुसार सर्वच विषय पारित करण्यात आले. तसेच सभासदांच्या सुचनेप्रमाणे संचालक मंडळाने शिष्यवृत्ती योजना, मृतक फंड व अन्य बाबीवर आपले मनोगत व्यक्त केले. संचालन उपाध्यक्ष विजय नागदेवे व आभार वंदना जीवने यांनी केले. सभेत प्रविण पिल्लेवार, मनोहर शेंडे, शिवदास बोंदाडे, पुरुषोत्तम बोरकर, सचिन जुमळे, दिपक राऊत, नरेंद्र गाटकिने, राजेश नागदेवे आदी संचालक व कर्मचारी, मंजुषा पाटिल, किर्ती देवतळे, संध्या यादव, रविंद्र राऊत व प्रतिक रामटेके व अभिकर्ता वर्ग उपस्थित होते.