संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्य शासनाची महिलांसाठीची महत्वकांक्षी असलेली माझी लाडकी बहीण योजनेचा समस्त महिलांसह कामठी शहर तसेच बिडगाव नगर पंचायत च्या महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रशासक संदीप बोरकर यांनी केले आहे.
महिलांच्या आरोग्य ,पोषण आणि आर्थिक स्वावलंबणासाठी तसेच कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत वय 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह 1 हजार 500 रुपये आर्थिक मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.या योजनेत कामठी च्या सर्व पात्र महिलांनी नगर परिषद कामठी नवीन कार्यालय पहिला मजला,अंगणवाडी केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्र येथे तसेच बिडगाव नगर पंचायत च्या सर्व पात्र महिलानी नगरपंचायत बिडगाव तरोडी(खुर्द)-पांढुर्णा कार्यालय व अंगणवाडी केंद्र(जुनी वस्ती बिडगाव अंगणवाडी केंद्र क्र 1,आराधना नगर अंगणवाडी केंद्र क्र 2,नागेश्वर नगर अंगणवाडी केंद्र क्र 3,जी प शाळा तरोडी खुर्द अंगणवाडी केंद्र क्र 4, तसेच आपले सरकार सेवा केंद्र आराधना नगर,बिडगाव या कार्यालयात कागदपत्र घेऊन तात्काळ आवेदन करून योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.
-ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड
2) मतदार ओळखपत्र
3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
4) जन्म दाखला
या चार पैकी कोणतेही प्रमानपत्र
-परराज्यात जन्म झालेल्या
महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1)जन्म दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
– अडीच लक्ष उत्तपन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड यांची झेरॉक्स,
– आधार कार्ड,बँक पासबुक ,पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र व मोबाईल नं.