महिला व बालविकास विभागामार्फत मतदार जागृतीसाठी महिला रॅली

पुणे :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभाग, स्वीप व्यवस्थापन कक्ष व मंथन फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे लोकसभा मतदार संघांतर्गत शहरातील बुधवार पेठ भागातील जास्तीत जास्त महिलांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी महिला रॅली काढण्यात आली.

यावेळी महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, जिल्हा परीवीक्षा अधिकारी संजय सांगळे, जिल्हा संरक्षण अधिकारी अंजना मोजर, संरक्षण अधिकारी अक्षय साळुंके, मयुर भूमकर, पद्माकर सुरुशे, प्रविण नेहरकर उपस्थित होते.

महिलांना मतदानाचे महत्त्व सांगण्यासाठी मतदानाच्या दिवसापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्रीमती रंधवे यांनी यावेळी सांगितले. मतदार ॲपबाबत माहिती देऊन मतदार यादीत नाव कसे शोधावे याबाबतही त्यांनी माहिती दिली. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा, सर्वांनी मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करारनामा

Thu Mar 28 , 2024
पुणे :- राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी, तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकसित केलेल्या ‘ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली’ संदर्भांत भारतीय स्टेट बँक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये करारनामा आज करण्यात आला. निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने सचिव वसंत पाटील आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com