परिवर्तनाची हाक देत ठाकरे गरजले तर वरुणराजा बरसले

– झिंगाबाई टाकळी येथील प्रचार सभेत वरुण राजानेही दिला ठाकरेंना आशीर्वाद

नागपूर :- एकीकडे इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून नागपूर लोकसभा निवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे सोमवारी झिंगाबाई टाकळी येथील सभा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. नियोजित पद्धतीने सभा सुरु असताना विकास ठाकरे भाषणासाठी उठताच वरुण राजाने जोरदार हजेरी लावली. छत्री-रेनकोट नसतानाही एकही नागरिक जागेवरुन उठला नाही.

परिवर्तनाच्या लढ्यातील नागरिकांची ठाकरे यांच्याबद्दलची आपूलकी आणि ठाकरेंचे नागरिकांसाठीचे प्रेम हे एक ऐतिहासीक क्षण ठरले. भर पावसात भिजताना ठाकरेंनीच भाषण केले नाही तर सभेत उपस्थित नागरिकांनीही भिजून या परिर्तनाच्या संघर्षात सहभागी झाले, असे दाखवून दिले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आता ही परिवर्तनाची लाट कोणीही थांबवू शकत नसल्याची भावना नागपूरकर सोशल मीडियावर व्यक्त करत आहे.

संविधान आणि लोकशाही रक्षणाची ही लढाई आता जनता विरुद्ध भाजप झाली आहे. यंदा मतदार हा मुर्ख बनणार नसून परिवर्तनाची हाक देतोय अशा प्रतिक्रीयाही सोशल मीडियावर व्यक्त झाल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घाटंजीचा निश्चित विकास करणार - ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

Wed Apr 17 , 2024
– ‘विकास म्हणजे सुधीर भाऊ’ या घोषणांनी निनादले घाटंजी – जन-आशीर्वाद यात्रेला भरघोस प्रतिसाद चंद्रपूर/घाटंजी :- काँग्रेस हा सेटिंग -फिटिंगचे राजकारण करणारा पक्ष आहे. परंतु, आपल्याला जर खरा विकास हवा असेल तर सर्वांनी कमळाचे बटन दाबायला हवे, असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com