घाटंजीचा निश्चित विकास करणार – ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

– ‘विकास म्हणजे सुधीर भाऊ’ या घोषणांनी निनादले घाटंजी

– जन-आशीर्वाद यात्रेला भरघोस प्रतिसाद

चंद्रपूर/घाटंजी :- काँग्रेस हा सेटिंग -फिटिंगचे राजकारण करणारा पक्ष आहे. परंतु, आपल्याला जर खरा विकास हवा असेल तर सर्वांनी कमळाचे बटन दाबायला हवे, असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. घाटंजीचा विकास निश्चित करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

घाटंजी येथे आज, 16 एप्रिल रोजी विकासपुरुष ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रचारार्थ जन-आशीर्वाद पदयात्रा काढण्‍यात आली. या यात्रेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

काँग्रेसला सत्ता दिल्यावर त्यांनी जनतेसाठी काहीच काम केले नाही, असे सांगून ना. मुनगंटीवार यांनी काँग्रेसचा खरमरीत समाचार घेतला. या उलट जर महायुतीला निवडून दिले तर शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला जाईल, असे ते म्‍हणाले.

‘विकास म्हणजे सुधीरभाऊ’

या यात्रेत हजारोंच्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदेमातरम’, ‘जयश्रीराम’ सह ‘विकास म्हणजे सुधीर भाऊ’, ‘सुधीरभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है’,’ चंद्रपूरचा वाघ -सुधीर भाऊ’ अश्या घोषणांनी घाटंजी निनादले. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे राहून सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देत होते. विशेष म्हणजे अबाल-वृद्ध, महिला-भगिनी, युवक वर्ग, विद्यार्थी वर्ग यांनी सुधीरभाऊ यांच्याशी संवाद साधला. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले.

भगवा ध्वज, कमळ आणि सेल्फी

या यात्रेदरम्यान भगवा ध्वज आणि कमळाचे चिन्ह यामुळे परिसर फुलून गेला होता. मोठ्या संख्येने समर्थकांच्या आत्मियतेने वातावरण भावनिक झाले होते. लोकांना सुधीरभाऊ यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरला नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पक्ष बढ़ाने से ज्यादा विपक्षी उम्मीदवारों के सामने मेमने छोड़े 

Wed Apr 17 , 2024
– संदीप जोशी सह अनेकों उम्मीदवारों MLC,MLA बनाने नही दिया,बल्कि बाहरी कृष्णा खोपड़े,समीर मेघे आदि को तरजीह दी                                                         नागपुर :- भाजपा के एकमात्र नेता है जिन्हें भाजपा से कही ज्यादा अन्य पक्ष के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com