भव्य भजन स्पर्धेचे सौ कांचनाताई गडकरींच्या हस्ते उदघाटन संपन्न 

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची संकल्पना 
नागपुर – अमृतधारा मातृशक्ती रेशीमबाग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारत सरकारचे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेली नागपुरातील महिला आणि पुरुष भजनी मंडळाची भव्य भजन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन  गुरुवारी ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई गडकरी यांच्या शुभहस्ते श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान रेशीमबाग नागपूर येथे भजनी मंडळाच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार  चंद्रशेखरजी बावनकुळे  तसंच प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे  शहर अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके,शिक्षक आमदार नागो गाणार सर,दक्षिण नागपूरचे आमदार मोहनभाऊ मते, भजन स्पर्धेचे आयोजक गिरीश वराडपांडे,भाजपा महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा सौ निताताई ठाकरे, दक्षिण मंडळ अध्यक्ष  देवेंद्र दस्तुरे,नगरसेविका सौ दिव्याताई धुरडे, ऍड रमण सेनाड,सौ सुमाताई सराफ आदी मान्यवर उपस्थित होते.दक्षिण मंडळातून एकूण 67 भजनी मंडळाचा सहभाग असून 1200 महिला सहभागी झाल्यात.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून मान्यवारांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर गिरिश वराडपांडे यांनी प्रास्ताविक करून भजन स्पर्धेची भूमिका मांडली. यानंतर देवेंद्र दस्तुरे आणि महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ नीताताई ठाकरे यांनी भजनी मंडळाना अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्यात. ईश्वराच्या भक्तीचे साधन म्हणजे भजन आणि या भजनाद्वारे आपण सर्वांनी ईश्वरीय सेवेचा आनंद घ्यावा असे गौरवोदगार काढले व कार्यक्रमाच्या उदघाटिका सौ कांचनताई गडकरी यांनी भक्तीगीत सादर करून भजन स्पर्धेचे विधिवत उदघाटन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केले. प्रत्येक विभागातून सात मंडळांची निवड करण्यात येत आहेत अशी सहा मतदार संघातून एकूण 42 मंडळांची निवड करण्यात येणार आहे *या भजन स्पर्धेची महाअंतीम फेरी रविवार दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी आयोजित असून भारत सरकारचे केंद्रीय मंत्री  नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते 42 मंडळांना भव्य रॊख  पुरस्कार गौरव चिन्ह सहित प्रदान करण्यात येईल. आज शुक्रवार दि 8 एप्रिल रोजी पूर्व नागपूर, पश्चिम  विभागाच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन पूर्व नागपूर चे आमदार पूर्व नागपूर ते आमदार  कृष्णा भाऊ खोपडे तसेच अध्यक्षस्थानी प्राध्यापक  अनिल  सोले प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर श्री संदीप जोशी, महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ अश्विनीताई जिचकार आदी  उपस्थित राहतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सर्व आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती तत्काळ द्यावी – जिल्हाधिकारी

Fri Apr 8 , 2022
नागपूर  :  कौशल्य विकास, रोजगार  विभागाच्या आयुक्तालयाच्या निर्देशानुसार रिक्तपदे अधिसूचित सक्ती करणारा कायदा, 1959 अन्वये जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी  शासनाच्या महास्वयंम या संकेतस्थळावर नोंदणीची प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करुन त्रैमासिक अहवाल इ-आर-1 ऑनलाईन पध्दतीने नियमित भरणे व पदे अधिसूचित करणे बंधनकारक आहे. परंतु जिल्हयातील अनेक आस्थापनांनी आजतागायत शासनाचे संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रीया पूर्ण केलेली नाही. याबाबत सर्व कार्यालयाच्या आस्थापनांनी तत्काळ संकेतस्थळावर आपली नोंदणी करुन माहिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights